पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची माहिती शाळांना द्यावी लागणार
राज्यातील सर्व प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विविध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकडून आकारलेल्या शुल्काची माहिती सादर करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची माहिती शाळांना द्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियमांना डावलून शाळांनी शुल्क आकारणी के ल्याबाबत कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अमर एकाड यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे माहिती मागवली होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व विभागाच्या उपसंचालकांना आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
www.konkantoday.com