चिपळूण तालुक्यातील मांडकी-घाणेकरवाडी येथे बंद घर फोडून रोख रक्कम ५० हजार लांबवले

चिपळूण तालुक्यातील मांडकी-घाणेकरवाडी येथे बंद घर फोडून रोख रक्कम ५० हजार लांबवली असल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
रमाकांत राजाराम सुर्वे (वय ७१, मांडकी-घाणेकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत सुर्वे यांचं घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील पडवीच्या दरवाजाचे कुलूप लोखंडी शिगेने तोडले. तसेच किचनचे लोखंडी ग्रील उचकटून वाकवून त्याद्वारे चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूमच्या दरवाजाचे कुलूप कापून त्याने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजारांची रोख रक्कम लांबवली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button