
खाजगी कंपन्यांप्रमाणेच वीज ग्राहकांच्या दिमतीला आता चॅट-बॉटची उर्जा
खाजगी कंपन्यांप्रमाणेच विविध शासकीय, निमशासकीय विभागांमार्फतही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये संपर्क माहिती देणे, तक्रारी नोंदवण्यासह आर्थिक व्यवहारांच्या विविध सेवा दिल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरण कंपनीनेही आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन सेवेचा विस्तार केला आहे. नुकताच महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उर्जा या चॅटबॉटचा समावेश वेबसाईटसह मोबाईल ऍपमध्ये करून ग्राहकांना एक सुखद धक्का दिला आहे.महावितरणने प्रारंभी आयव्हीआरएसच्या माध्यमातून दूरध्वनीद्वारे काही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर mahadiscom.com व mahadiscom.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी, तक्रार निवारण, देयक भरणा आदी सुविधा उपब्ध करून देण्यात आल्या. त्यामागोमाग मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही ग्राहकांना अनेक सेवा घरसबल्या एका क्लिकवर मिळत आहेत. याच्याच जोडीला इन्फ्रारेड मिटर्स, प्रि-पेड मिटर्स यासारखे बदलही सुरू आहेत. www.konkantoday.com