
कुसुमताई पतसंस्थेचा चढता आलेख असाच कायम रहावा, माजी नगरसेविका ज्येष्ठ सभासद सुनिता पाटणकर
रत्नागिरी – माजी आमदार कुसुमताई अंभ्यकर यांच्या विचारांवर कुसुमताई पतंसंस्थेचा कारभार चालत आहे, याचे मला समाधान आहे. कारण मी कुसुमताईंबरोबर काम केले आहे. पतसंस्थेचा चढता आलेख असाच कायम रहावा, असे प्रतिपादन माजी नगरसेविका ज्येष्ठ सभासद सुनिता पाटणकर यांनी केले. कुसुमताई पतसंस्थेच्या रत्नागिरीतील मुख्य कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतिश शेवडे, रामचंद्र केळकर, संतोष कोकरे, बापू गवाणकर, प्रमोद रेडीज, विजय बेहरे, प्रसन्न दामले, तेजा मुळ्ये, लिना घाडीगावकर, महेश सनगरे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या, आजच्या स्पर्धेच्या युगात तोंडात गुळाचा खडा आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम केले पाहिजे. आलेल्या ग्राहकांना कशी वागणूक मिळते, यावर पतसंस्थेचे हित अवलंबून आहे. हा ताळमेळ कुसुमताई पतसंस्थेने चांगल्या पध्दतीने जपला आहे. माजी आमदार कुसुमताई समाजात काम करताना लोकांच्या चुलीपर्यंत जात होत्या. राजकीय क्षेत्रातही त्यांचे नाव घेतले जाते, ते त्यांचे आचरण आणि विचारांमुळे. त्याच विचारांवर कुसुमताई पतंसंस्थेचा कारभार चालत आहे, याचे मला समाधान आहे. कारण मी कुसुमताईंबरोबर काम केले आहे. पतसंस्थेचा चढता आलेख असाच कायम रहावा, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष शेवडे यांनी पतसंस्थेविषयी माहिती दिली. पतसंस्थेने ठेवीदारांसाठी १ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत ठेववृध्दी मासात आकर्षक व्याजदर व ठेव योजना जाहीर केली होती. त्याला सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभला. एका महिन्यात ४ कोटी रूपयांच्या ठेवी जमा झाल्या. तसेच मागील चार महिन्यात पतसंस्थेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर पतसंस्थेने सामाजिक उपक्रम म्हणून योगिता सातोपे या महिलेला रोजगार निर्मितीसाठी शिलाई मशीन भेट देण्यात आली.www.konkantoday.com




