गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा-जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, त्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. अशातच उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे. या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ट्विट करून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.शौमिका महाडिक यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेत होतो; तेव्हा हट्ट केला आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय.
www.konkantoday.com