सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार असून वर्षभरातील चाचणी, सहामाही परीक्षांच्या आधारे शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून मंडळाकडे निकाल द्यायचा आहे.
‘सीबीएसई’ने दहावीची परीक्षा रद्द केली. त्याचवेळी विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. मात्र, तरीही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार याबाबत अनेक प्रशद्ब्रा उपस्थित झाले होते. आता मंडळाने मूल्यमापन आराखडा जाहीर केला असून यंदाही १०० पैकीच गुण ग्राह््य धरण्यात येणार आहेत. शाळांनी मे महिन्यात मूल्यमापनाचे काम पूर्ण करून ११ जूनपर्यंत मंडळाकडे निकाल पाठवायचा आहे.
www.konkantoday.com