*’सिंधुरत्न’ मधून पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*रत्नागिरी, दि. 6 : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 या वर्षामध्ये सिंधुरत्न समृध्द योजने अंतर्गत दुग्धव्यवसायासाठी अनुदानावर दुधाळ जनावर पुरवठा करणे, शेळीपालन व्यवसायास प्रोत्साहन देणे, शेळीगट पुरवठा करणे, कुक्कुटपक्षी संगोपनास अर्थसहाय्य करणे यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जे. पी. जाधव, यांनी दिली. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% अनुदान व अनु.जाती व जमाती प्रवर्गासठी 75 % अनुदान दिले जाणार आहे. पशुपालकांनी विहित नमुन्यात अर्ज, आधारकार्ड सत्यप्रत, रेशनकार्ड सत्यप्रत, अपत्य दाखला, रहिवाशी दाखला, 7/12 व 8 अ उतारा, जमीन स्वतःच्या नावे नसल्यास जमीन मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायत नमुना नं 8 उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, जातीचा दाखला ( लागू असल्यास), दारिद्रय रेषेखालील दाखला (लागू असल्यास), यापूर्वी अशा योजनेचा लाभ न घेतल्याचे आणि शासकीय/निमशासकीय सेवेत नसल्याचे स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी येथे संपर्क साधावा.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button