
महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर अंबानी दांपत्य वॉकसाठी आल्याने गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळं ठोकलं
रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र लॉकडाउन असतानाही रविवारी सायंकाळी अंबानी दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसहीत महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर वॉकसाठी आले होते. त्यामुळेच पालिकेने या गोल्फ मैदानाची मालकी असणाऱ्या संस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्यामुळे दि गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळं ठोकलं आहे. या मैदानात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाहीय.
www.konkantoday.com