सिरमच्या कोरोना लसीसाठी देशातील अनेक बडय़ा व्यक्तींकडून धमक्यांचे फोन -सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला
सिरमच्या कोरोना लसीसाठी देशातील अनेक बडय़ा व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत आहेत. विविध घटकांकडून कोविशील्ड लसीसाठीचा दबाव वाढतोय. यामुळे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला देशाबाहेर लस उत्पादन हलविण्याच्या विचार करत आहेत.
कोविशील्ड लसीसाठी आपल्याला देशातील काही बडय़ा व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश असल्याचं ‘द टाइम्स यूके’ला दिलेल्या मुलाखतीत पुनावाला यांनी म्हटलं आहे. अदर पुनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली आहे.
www.konkantoday.com