
राजापूर पोलीस स्थानकाने हातिवले, तर नाटे पोलीस ठाण्याने दळे गाव दत्तक घेतले
राजापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्थानकाने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन तेथे घरा-घरात जाऊन तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलीस स्थानकाने हातिवले, तर नाटे पोलीस ठाण्याने दळे गाव दत्तक घेतले आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच, आता पोलीस स्थानकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन तेथील घरा-घरात जाऊन जनतेची तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक पोलीस स्थानकात धडकले आहेत.
www.konka.today.com