
ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची बेकायदेशिरपणे वाहतुक केल्याप्रकरणी लांजा कोर्ले फाटा येथे तीन लक्झरींवर कारवाई
कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकार्यांनी पारित केलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची बेकायदेशिरपणे वाहतुक केल्याप्रकरणी लांजा कोर्ले फाटा येथे शनिवारी सायंकाळी तीन लक्झरींवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत चार जणांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन लक्ष्मण विचारे (रा.ठाणे), प्रभाकर सिताराम घाणेकर (,रा.जाकादेवी), सचिन सुरेश सरवणकर (,रा.पाचल,राजापूर) आणि कुंदन पांडुरंग तेलंग (रा.पाचल नारकरवाडी,राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे संशयित आपल्या ताब्यातील तीन लक्झरी ट्रॅव्हल्समधून ४७ प्रवाशांकडे ई- पास नसताना तसेेचे प्रवाशांचा पल्सरेट,ऑक्सिजन लेव्हल ईत्यादी बाबी चेक न करता त्यांची वाहतुक करत होते. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com