जिल्हाप्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच
कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हाप्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, कोविडमुक्तरत्नागिरी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेपरिपत्रक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले
आहे.जिल्ह्यात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. रुग्णसंख्या थांबता
थांबेना, असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यातचकोरोनामुळे मृत्यूदरदेखील वाढला आहे. यावर नियंत्रणमिळवण्यासाठी प्रशासनाने नवी मोहिम हाती घेतली आहे. ‘माझी
रत्नागिरी, माझी जबाबदारी, कोविडमुक्त रत्नागिरी’ यामोहिमे अंतर्गत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नप्रशासनाने सुरू केला आहे.
या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या
व्यक्तींचा शोध घेणे व वेळेवर उपचार करणे हा मुख्य उद्देश आहे.त्यामध्ये गृहभेटी देण्यासाठी एक पथक तयार करण्यात यावे.
त्यामध्ये पाच सदस्य असावेत. या पथकामध्ये ग्रामकृतीदल,ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायतकर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीसपाटीलआदींचा समावेश असावा. एका पथकात केवळ पाच सदस्यअसावेत असे सूचित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com