एसटी चालकांनी कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अँम्ब्युलन्स चालकाची भूमिका निभावण्याची तयारी दर्शविली
रेल्वेच्या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’वर टँकर चढविण्यासाठी मदत हवी असल्यास आमचे एसटी चालक मदत करतील, असे आश्वासन परिवहनमंत्री अँड. अनिल परब यांनी दिले होते. आता ग्रामीण भागात अँम्ब्युलन्स चालक मिळत नसल्याने एसटी चालकांनी कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अँम्ब्युलन्स चालकाची भूमिका निभावण्याची तयारी दर्शविली आहे.
कोरोनाची गेल्या वर्षी लाट आली तेव्हा लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबईची लाइफ लाइन २२मार्चपासून बंद करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील डॉक्टर, नर्स, पोलीस आणि पालिका कर्मचारी या अत्यावश्यक कर्मचाऱयांना त्यांच्या घर ते कार्यालय आणि पुन्हा कार्यालय ते घरी पोहचविण्याची जबाबदारी मुंबईच्या बेस्टने आपल्या खांद्यावर घेतली होती.
www.konkantoday.com