
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसीतील टी. जे. मरीनअपघात प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसीतील टी. जे. मरीन कंपनीत ड्रायरमध्ये दाेन कामगार चिरडल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजता घडली हाेती. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कंपनीतील तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप सोना सनगरे, विक्रांत विभाकर पवार आणि मोहम्मद उमर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
www.konkantoday.com