
रत्नागिरीत क्रेडाईतर्फे ३ रोजी सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन.
क्रेडाई रत्नागिरीतर्फे सायबर गुन्हा जागरूकता कार्यक्रम ३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दु. २ या वेळेत हॉटेल लँडमार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीम. गायकवाड उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून पो. नि. स्मिता सुमार व सहा. पो. नितीन पुरळकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये बांधकाम व्यवसायातील सायबरमुळे ऑनलाईन फसवणुकीतील धोक्याबाबत समज वाढण्यासाठी तसेच सायबर सुरक्षेच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.www.konkantoday.com