
बदलत्या हवामानाचा फटका आंबा,काजूबरोबरच कोकम उत्पादनालाही
आंबा, काजूप्रमाणेच कोकम उत्पादक शेतकर्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. याचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील कोकम प्रक्रिया उद्योगाला बसला आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने नैसर्गिकरीत्या उगवलेल्या झाडांपासून कोकम उत्पादन मिळते. अलीकडेच कोकमला ‘जीआय’ मानांकन प्राप्त झाले आहे. देशातील केरळ, कर्नाटकातील किनारपट्टी प्रदेश, गोवा आणि कोकण या भागात मिळून एकूण ९३ टक्के कोकमचे उत्पादन होते; मात्र यावर्षी बदलत्या हवामानाचा फटका आंबा,काजूबरोबरच कोकम उत्पादनालाही बसला आहे.
www.konkantoday.com