उद्या पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थीना ५ लसीकरण केंद्रांवर कोवीड १९ लसीकरण करणेत येणार

रत्नागिरी जिल्हयामध्ये दिनांक ०२/०५/२०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थीना ५ लसीकरण
केंद्रांवर कोवीड १९ लसीकरण करणेत येणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार सदर वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणा साठीच हा स्वतंत्र लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यातआलेला आहे .त्यामुळे ४५ वर्षावरील
नागरिकांना सदर लसीकरण केंद्रावर लसीकरण करणेत येणार नाही.
४५ वर्षावरील नागरीकांसाठी यापूर्वी प्रमाणेच स्वतंत्र लसीचा साठा प्राप्त होणार असून त्यामधून त्यांचे
लसीकरण करणेत येईल. तरी सर्व नागरिकांनी यांची नोंद घेऊन विनाकारण लसीकरण सत्राच्या ठिकाणी गर्दो न करता लसीकरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button