
ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद
राज्यात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान 300 रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 37 हजार 891 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे घरी उपचार घेत असलेले कोरोना रुग्ण किंवा विलगीकरणात असलेले रुग्णही या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे
www.konkantoday.com