रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश
रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसिएल २१०१३ बॅचचा वापर करू नये असे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना जारी केले आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या इजेंक्शनचे रुग्णांवर प्रतिकूल परिणाम झाल्यांची गंभीर बाब समोर आली आहे.या इंजेक्शनच्या ५०० लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या यापैकी १२० लसी रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना लस घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसिएल २१०१३ इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची विनंती केली. याबाबत कंपनीच्या वतीने एक पत्र गुरुवारी जारी करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा असे यात नमुद करण्यात आले आहे
www.konkantoday.com