राजापूरातील उन्हाळे येथील गंगामाईचे गुरूवारी आगमन झाले
देशभरात कोराना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापूरातील उन्हाळे येथील गंगामाईचे गुरूवारी सकाळी आगमन झाले आहे. गतवर्षीही एपिल महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर वर्ष होताच गंगामाई पुन्हा प्रकटली आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या पमाणात पाणी साचले असून काशीकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्रोत सुरू झाला आहे.
www.konkantoday.com