रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीमधील टी. जे. मरिन कंपनीला नामदार उदय सामंत यांनी भेट घेऊन पाहणी केली
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीमधील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू कशी ठेवली, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला सामंत यांनी विचारत धारेवर धरले. दोन दिवसांपूर्वी मिरजोळे ग्रामपंचायतीने या कंपनीला कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू ठेवल्याबाबत नोटीस दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कंपनीच्या मालकाला जाब विचारला कंपनी मालकानी उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून आपण मृताच्या नातेवाइकांना १० लाखांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com