रत्नागिरी तालुक्यातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार
सध्या रत्नागिरी शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियमित वाढत असून रत्नागिरी तालुक्यात सहा शासकिय कोविड केअर सेंटर कार्यरत असुन त्यामध्ये रुग्णांना दाखल करण्याचा प्राधान्यक्रम खालील प्रमाणे ठरविलेला आहे.त्याप्रमाणे ज्या रुग्णांची आर. टी. पि. सी. आर. अथवा एंन्टीजन चाचणी सकारात्मक आलेली आहे, अशा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना खालीलप्रमाणे कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. सामाजिक न्याय भवन कोव्हीड केअर सेंटर येथे गरोदर माता, महिला व लहान मुले अशा रुग्णांना अँडमिट करण्यात येईल. बी.एड. कॉलेज कोव्हीड केअर सेंटर येथे सहव्याधी रुग्णांना व ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना अँडमिट करणेसाठी प्राधान्य देण्यात येईल. दामले हायस्कुल कोव्हीड केअर सेंटर येथे ४५ वर्षापेक्षा कमी वयाचे व तरुण रुग्णांना अँडमिट करण्यांत येईल. तसेच आय.टी.आय. व गोगटे कॉलेज गर्ल्स हॉस्टेल तसेच नगर पालिका, रत्नागिरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वसाधारण व इतर रुग्णांना अँडमिट करण्यांत येईल.
www.konkantoday.com