रत्नागिरी जिल्ह्यात सध्या एकही धरण धोकादायक नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांची मान्सुनपूर्व तपासणी करण्यात आली आहे. गतवर्षीची धोकादायक ठरलेल्या धरणांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून सध्या जिल्ह्यात एकही धरण धोकादायक नाही, अशी माहिती रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ६१ धरणे आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या धरणांच्या सुरक्षिततेची पाहणी केली जाते
www.konkantoday.com