पतसंस्था कर्मचा-यांना लसीकरणाची रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांची मागणी पूर्ण
राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. या पार्श्व भुमीवर ब्रेक द चेन या आदेशान्वये बँका व पतसंस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने त्यांचे कामकाज मात्र सुरु आहे. या पुर्वीच्या पहिल्या लाटेमध्ये सुध्दा पतसंस्थानी आपले कामकाज सुरु ठेवले होते व नागरिकांस आर्थिक सेवा देण्याचे काम केले आहे. ग्रामीण व शहरी भागाता धोका पत्करुन पतसंस्थेचे कर्मचारी आर्थिक सेवा देत आहेत. यामुळे या कर्मचा-यांना लसीकरणामध्ये फ्रंट लाईन वर्कर म्हणून प्राधान्य हवे ही मागणी रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अँड..दीपक पटवर्धन यांनी शासनाकडे लाऊन धरली होती. राज्य फेडरेशननेही ह्या मागणीचा पाठपुरावा केला होता. ही मागणी आता मान्य झाली असुन पतसंस्थातील कर्मचारी यांचे लसीकरण करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे आदेश मा . सहकार आयुक्त यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत अशी माहिती अँड.दीपक पटवर्धन यांनी दिली आहे तरी सर्व पतसंस्था कर्मचारी यांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
www.konkantoday.com