चिपळुुण भागात मागील विज बिले भरण्यासाठीमहावितरणकडून लाॅकडाऊनमध्येही ग्राहकांवर दबाव
महावितरण कडून वीज बिले भरण्यासाठी फोन करून नागरिकांना वीजबिले भरण्यासाठी आग्रह केला जात असल्याच्या तक्रारी चिपळूण परिसरातील वीज ग्राहकांनी केल्या आहेत मागील परिस्थितीतून सावरण्याआधीच परत एकदा लॉक डाऊन सुरू झाला आहे लॉक डाउन आहे त्यामुळे सर्वजण अडचणीत आहेत चिपळूण मधील नागरिकांनी बऱ्यापैकी बिल भरलेली आहेत आत्ता ८०टक्के व्यवसाय बंद आहेत
ज्यांचे व्यवसाय चालू आहे त्याची वसुली केली तर ठीक होते परंतु आता अनेकांचे व्यवसाय बंद आहेत त्यांच्यावर वीजबिल भरण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे परंतु पैसा नसल्याने हे बिल भरायचे कसे अशी चिंता वीजग्राहकांना आहे यामुळे सध्यातरी वीजग्राहक दुहेरी संकटात सापडले आहेत
www.konkantoday.com