कौस्तुभ बुटाला यांनी खेडमधील कोव्हिडकेअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्संट्रेट यंत्रणा भेट दिल्या
राज्यात एका बाजूला कोरोनाचा कहर सुरू असताना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीत पुणे येथील तरुण उद्योजक आणि ऑक्सिजन नियोजन समिती पुणेचे सदस्य कौस्तुभ बुटाला यांनी खेडमधील नगर पालिकेच्या दवाखाना परिसरात सुरु असलेल्या कोव्हिडकेअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्संट्रेट यंत्रणा भेट दिल्या आहेत. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या मशिनचा उपयोग ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना आता मोफत ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी राज्यातील पहिली ‘ऑक्सिजन छावणी’ हा प्रयोग काही दिवसांत करण्यात येणार असून तो यशस्वी झाल्यास तशा छावण्या विविध कोरोना हॉटस्पॉटवर उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी कौस्तुभ बुटाला यांनी दिली.
www.konkantoday.com