
उष्मा वाढत असल्याने जगबुडी नदीपात्रातील पाण्याची पातळी घटतेय.
खेड तालुक्यात यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने जगबुडी नदीपात्रासह नारिंगी नदी व ग्रामीण भागातील नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला होता. सद्यस्थितीत उष्मा हळुहळू वाढू लागला आहे. यामुळे उपलब्ध पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये घट होवू लागली आहे. भरणे जगबुडी नदीपात्रातील पाण्याची पातळीही घटत चालली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यात यंदा ४३४२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
धुवॉंधार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात नातूनगर, शिरवली, पिंपळवाडी, कोंडिवली धरण येथील ओव्हरफ्लो होवून मुबलक प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला होता. धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाईची समस्या कमी प्रमाणात जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हळुहळू ×उष्मा वाढू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटत चालले आहेत.www.konkantoday.com