शेंबवणेतील त्या दोन महिलांनी उपचारासाठी कोल्हापूर गाठल्याचे पुढे आले
अँटीजेन तपासणी अहवाल पॉझिटीव्ह येताच राजापूरच्या ग्रामीण रूग्णालयातून मंगळवारी दुपारी लहान मुलासह पलायन केलेल्या शेंबवणेतील त्या दोन महिलांनी उपचारासाठी कोल्हापूर गाठल्याचे पुढे आले आहे. यातील एका महिलेच्या मुलाने परस्पर त्यांना उपचारासाठी कोल्हापूरात नेले आहे. मात्र त्यांची शोधाशोध करताना आरोग्य विभागाची चांगलीच तांराबळ उडाली होती.
www.konkantoday.com