राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी सिंधुदुर्गसह तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल २ कोटी ३२ लाख आणि २१ हजार रुपयांची दारु जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल २ कोटी ३२ लाख आणि २१ हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दारुची वाहतूक सुरु होती.नागपूर जिल्ह्यात पांढुरना-नागपूर मार्गावर गोपनीय माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. पकडलेल्या ट्रकमध्ये देशी दारुचे १००० बॉक्स सापडले असून प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारुच्या ४५ बॉटल म्हणजेच एकूण ४५हजार बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल ३९लाखांचा असून महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही दारु मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात होती.लॉकडाऊनच्या काळातील नाकाबंदी दरम्यान रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाटूळ गावच्या ब्रीजवर राज्य उत्पादन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल १कोटी ६० लाख ८०हजाराची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. बुधवारी संध्याकाळी वाटूळ गावच्या ब्रीजवर ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी मूळचा केरळमधील कसारागोड तालुक्यातील चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईत कंटेनर, दारु आणि मोबाईलसह जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ही १ कोटी ७२ लाख आणि ८५हजार इतकी आहे.सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कळसुली फाट्यावर बेकायदा दारु वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यामध्ये कारवाईत ३२ लाख ४१ हजाराची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कृष्णा दुलाराम शिटोळे, मध्यप्रदेशमधील एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. कारवाईत ११ लाखाच्या ट्रकसह एकूण ४३ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
www.konkantoday.com