रस्त्याच्या कडेला जेवायला बसलेल्या भाजी विक्रेत्यांचा विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू
राजापूर मुंबई गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विचित्र पध्दतीने झालेल्या अपघातात भाजी विक्री करणाऱ्या कुटुंबातील निखिल पोपट साळुंखे (वय ३२ रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश पांचाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील भाजी विक्रेते कुटुंब जेवण करण्यासाठी महामार्गाच्या बाजूला बसले होते. याच दरम्यान महामार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकला समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली.धडकेमध्ये कंटेनरचा फाळका तुटून तो या जेवण करणाऱ्या कुटुंबाच्या अंगावर येऊन पडला. यामध्ये भाजी विक्री करणारे निखिल पोपट साळुंखे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश पांचाळ गंभीर जखमी झाल्या
www.konkantoday.com