रत्नागिरीच्या धन्वंतरी हॉस्पीटलला मिळाले एनएबीएचचे मानांकन

रत्नागिरी- शहरातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पीटलला नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हाईडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले आहे. हे असे मानांकन मिळाल्याने हॉस्पीटलचा दर्जा अधिक सुधारणार आहे. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र नुकतेच रुग्णालयास प्राप्त झाले.
बालरोगतज्ञ डॉ. नीलेश शिंदे आणि स्त्री रोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे दांपत्याने धन्वंतरी हॉस्पीटल सुरू केले. त्यानंतर कोकणातील 2014 मध्ये पहिल्या रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचीही स्थापना केली. धन्वंतरी हॉस्पीटलला एनएबीएचचे मानांकन मिळाले आहे. हे मानांकन 25 मार्च 2021 ते 24 मार्च 2023 या कालावधीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. सुमारे 4 वर्षापूर्वी या हॉस्पीटलला आयएसओ 9001 मानांकन मिळाले होते.
धन्वंतरी हॉस्पीटलच्या नर्सेस आणि सर्व कर्मचारी एकत्र मिळून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या या चांगल्या सेवेमुळे व अथक परिश्रममामुळे एनएबीएचचे मानांकन मिळाले आहे, असे डॉ. शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रीय पातळीवरील हे मानांकन मिळवण्यासाठी विविध मानके ठरवण्यात आली आहेत. यामध्ये हॉस्पीटलमध्ये प्रवेश, मूल्यांकन, रुग्णांची काळजी, औषध व्यवस्थापन, रुग्णांचे हक्क आणि शिक्षण, हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल, सतत गुणवत्ता सुधार, व्यवस्थापनाची जबाबदारी, सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा, मानव संसाधन व्यवस्थापन, माहिती व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश आहे.
रुग्णालयांचा दर्जा ठरवण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) चा घटक म्हणून 2006 मध्ये एनएबीएच मान्यता प्रणालीची स्थापना करण्यात आली. आता या मानदंडांची चौथी आवृत्ती वापरली जात आहे. आतापर्यंत भारतातील अंदाजे 3500 हून अधिक रुग्णालये एनएबीएचने प्रमाणित केली आहेत. धन्वंतरी हॉस्पीटलला हे मानांकन मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button