भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास ४००० कोरोना केअर कोच तयार केले
कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळणेही अवघड झाले आहे. यातच भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास ४००० कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास ६४००० बेड आहेत. तसेच यांपैकी आतापर्यंत १६९ कोरोना केअर कोच राज्यांना वापरासाठीदेखील सोपविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या कोरोना केअर कोचचा वापरही सुरू झाला आहे.
www.konkantoday.com