हातखंबा येथे बोलेरो व ट्रक अपघात

बेदरकारपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या बोलेरोला धडक देत अपघात केला. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघातात हातखंबा येथील वळणात घडली.
याबाबत जखमी बोलेरो चालक सदानंद जनार्दन साळवी ( काजूर्ली गुहागर ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील बोलेरो घेऊन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता.त्याच सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक वरील चालकाने विरुद्ध दिशेला येऊन साळवी यांच्या बोलेरोला मध्यभागी धडक देत अपघात केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button