
रत्नागिरी शहरानजीकच्या उद्यमनगर येथे सुमारे ७८ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महिला रुग्णालयाच्या सांडपाणी निचरा प्रकल्पाच्या कामाची चौकशी होणार
रत्नागिरी शहरानजीकच्या उद्यमनगर येथे सुमारे ७८ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महिला रुग्णालयाच्या सांडपाणी निचरा प्रकल्प तसेच अन्य निष्कृष्ट कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी केल्यानंतर या कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे जाहीर केले.
हे महिला रुग्णालय व समोरील सांडपाणी वाहून नेण्यासाठी शासनाने एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले होते. त्यातून सांडपाणी निचरा प्रकल्प उभारण्यात येणार होते. दोन वर्षे होऊनही बांधकाम विभागाने हा प्रकल्प पूर्ण न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांची दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी सोमवारी सायंकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
www.konkantoday.com