
दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
जगभरातील बौद्ध अनुयायांसह तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथे सुरू असलेले अंडरग्राऊंड पार्किंगचे काम धोकादायक असून प्रशासनाने स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही ते सुरू केले. पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका निर्माण होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल, त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी या कामाविरोधात स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले. या ठिकाणी प्रशासन मनमानी कारभार करीत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील भीत अनुयायी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. www.konkantoday.com