दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल -शिवसेना खासदार संजय राऊत
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेलत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
www.konkantoday.com