जिल्हाशासकीय रुग्णालयातील अनेक गैरसोयीं व सुरक्षितते बाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी – भारतीय युवा मोर्चाचे अनिकेत पटवर्धन यांची जिल्हा शल्यचिकित्सकां कडे मागणी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व कोव्हिड रुग्णालय येथे अनेक गैरसोयी असून अनेक ठिकाणी सुरक्षिततेचे पालन केले जात नाही याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा दक्षिण भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र लिहून केली आहे या पत्रात त्यांनी म्हटले की जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन प्लॅंटमधून वितरित होणाऱ्या ऑक्सिजन यावर सिलिंडर संपतेवेळी लक्ष ठेवण्यासाठी एक अधिकारी नेमणे आवश्यक आहे विशेषत रात्री सदर यंत्रणा हाताळणारी व्यक्ती गमबूट, हेल्मेट ,ग्लाेज आदींचा वापर करीत नाही जिल्हा रुग्णालयातील वॉर्डातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असून ती तर दोन तासानी साफ करणे आवश्यक आहे जिल्हा रुग्णालयातील सर्व वॉर्डमधील इलेक्ट्रिक उपकरणे बंद अवस्थेत असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावीत याशिवाय पॅसेजमधील स्वच्छतागृहातील उपकरणे देखील बंद अवस्थेत आहे नॉन कोव्हीड आयसीयू युनिटमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे तसेच जिल्हा रुग्णालयातील जनरल वॉर्ड व कोरोना वॉर्ड यांचा रहदारीचा रस्ता पूर्ण वेगळा करणे आवश्यक आहे जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग व नॉन काेक्विड पेशंट यांची गतवेळीप्रमाणे वेगळी व्यवस्था करणे गरजेचे आहे जिल्हा रुग्णालयात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, नर्स ,वॉर्डबॉय याना सुरक्षिततेची साधने पुरवली जात नाही त्यांना पीपी किट, मॉस्क , ग्लोज आदि तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे काेव्हिड रत्नागिरी डॉटकॉम जीआर ची ही वेबसाईट वरील बेड व्यवस्थाचे कॉलम दोन तासांनी अपडेट करणे गरजेचे आहे तसेच सदर हॉस्पिटलच्या बेडच्या संदर्भात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे फोन हे बऱ्याच वेळेला बंद असतात किंवा ते उचलत नाहीत त्यांना त्याबाबत सूचना करण्यात याव्यात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांबरोबर नातेवाईकांना भेटून जाण्यास मनाई करण्यात यावी कारण त्यांचे नातेवाईक रुग्णाला भेटून आल्यानंतर आपल्या घरी परत जात असतात रुग्णांसाठी आणलेले जेवण ,औषधे पाणी हे नातेवाईकांबरोबर न पाठवता प्रशासनाने त्यासाठी हंगामी स्वरूपात कर्मचारी नेमावा म्हणजे या गोष्टीला आळा बसेल
कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे शव वॉर्डमध्ये अनेक तास ठेवले जाते त्याचा परिणाम अन्य रुग्णांच्या मानसिकतेवर होऊ होत आहे त्याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे आरटी पीसीआर टेस्ट लॅबची क्षमता कमी पडत असल्याने अजून चार हजार नमुने तपासणे बाकी असल्याचा आरोपही पटवर्धन यांनी केला असून यात तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे कोराेनाने मृत झालेल्या व्यक्तीचे कोरोना निदान चाचणी अहवाल त्याच दिवशी मिळावेत अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे जिल्हा रूग्णालयात वरील अनेक अडचणी व समस्या असून त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button