खेड बोरज नळ पाणी योजनेच्या विहिरी जवळ नदी पात्रात मासे मृतावस्थेत आढळले,चौकशीची मागणी
खेड बोरज नळ पाणी योजनेच्या विहिरी जवळ नदी पात्रात शनिवारी मासे मृतावस्थेत आढळले असून या प्रकरणी चौकशी करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सुरेंद्र तांबे यांनी ग्रामपंचायत व प्रशासनाकडे केली आहे. तालुक्यातील बोरज गावातील नळ पाणी योजनेच्या विहिर परिसरातील नदी पात्रात तिन दिवसांपुर्वी मृत माशांचा खच आढळला आहे. या बाबत माहिती देताना तांबे म्हणाले की, शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी नळ पाणी योजनेच्या विहिरीजवळ नदी पात्रात कोणीतरी रसायन ओतल्याचा संशय आहे. विहिरीतील पाण्याला देखील उग्र वास येत आहे. त्यामुळे पाणी नमुने आरोग्य विभागाकडे तपासून घेणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com