
आधी रक्तदान करा, मगच लस घ्या-मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यातच नव्हे तर अवघ्या देशातच सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमानं घातलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दरम्यान, जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर लस घेतल्यानंतर काही कालावधीसाठी तुम्हाला रक्तदान करता येणार नाही, त्यामुळे “आधी रक्तदान करा, मगच लस घ्या” असं आवाहनं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या जनतेला केलं आहे.
www.konkantoday.com