५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय

राज्य सरकारने अनलॉक ५ साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करायला राज्य शासनाने परवानगी दिली आहे.तसंच अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग देखील सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर देखील कसलेही निर्बंध आता नसणार आहेत.
मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तर पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसंच मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या वाहतूकीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे ३१ ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे बंद राहतील. तसंच मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही. सामाजिक, कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button