वादग्रस्त पोस्टसाठी त्या ग्रुपचा ॲडमिन जबाबदार असू शकत नाही- नागपूर खंडपीठाचा निर्णय
व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या एखाद्या वादग्रस्त पोस्टसाठी त्या ग्रुपचा ॲडमिन जबाबदार असू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा नुकत्याच एका निकाला दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. जर एखादी व्यक्ती केवळ त्या ग्रुपचा अॅडमिन आहे आणि अन्य सदस्यांने टाकलेली पोस्ट त्याच्या अपरोक्ष टाकली असेल तर त्या पोस्टसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. केवळ ॲडमिन म्हणून त्या पोस्टचा त्याच्याशी थेट संबंध जोडून त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही, असंही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे.
www.konkantoday.com