लोटे परिसरातील तिघा तरुणांनी सुरू केलेला प्रकल्प जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रायो गॅस कंपनीतून तयार होणारे ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील तिघा तरुणांनी सुरू केलेला हा प्रकल्प अवघ्या जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे
औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांत ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालविण्यासाठी ऑक्सिजन वापरले जाते. कारखान्यांची ही गरज ओळखून लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील आवाशी गावातील सतीश आंब्रे, शेल्डी येथील सचिन आंब्रे आणि लोटे गावातील सचिन चाळके या तिघा तरुणांनी जानेवारी २०२०मध्ये लोटे औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन निर्मितीचा क्रायो गॅस हा प्रकल्प उभारला आहे सध्या हाच प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवत आहे
www.konkantoday.com