
राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत- शिवसेना खासदार संजय राऊत
कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील सत्ताधाऱ्यांना, भारत सरकारला आलेल्या अपयशावर लक्ष वेधत जागतिक स्तरावर ताशेरे ओढण्याच आले आहेत. अनेक जागतिक माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पण, देशाची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत असं लक्षवेधी वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
www.konkantoday.com