
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या पाठोपाठ साखरपा आरोग्य केंद्रालाही गळती
नूतनीकरण करून दीड महिन्यांपूर्वी ताबा दिलेल्या रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला गळती झाल्याचे वृत्त असतानाच आता नूतनीकरण केलेल्या साखरपा आरोग्य केंद्रालाही गळती लागल्याचे उघड झाले आहे साखरपा आरोग्य केंद्राची इमारत पन्नास वर्षांपूर्वीचे असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लाखो रुपये खर्च करून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले होते याचे उद्घाटनही मार्च महिन्यात आमदार राजन साळवी व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले होते मात्र त्याला काही महिने उलटले नाही तोच या नव्या इमारतीला गळती लागली आहे इमारतीतील प्रसुती कक्ष शस्त्रक्रिया विभाग निर्जंतुकीकरण व अन्य सहा कक्षांना गळती लागली आहे यामुळे गेल्या महिन्यात नसबंदीचे शिबिरही रद्द करावे लागले होते या सर्वांमुळे दुरुस्तीच्या नावाने होणाऱ्या खर्च व विभागाकडून होणाऱ्या कामाचा दर्जा याबाबत शंका उपस्थित होत आहे.
www.konkantoday.com




