आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने निसर्गालाही बोलतं करण्याची किमया साध्य केली आहे ती वलवते गावातील युवा चित्रकार प्रणय प्रकाश फराटे याने
लॉकडाऊनच्या या कठीण प्रसंगात आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने निसर्गालाही बोलतं करण्याची किमया साध्य केली आहे ती रत्नागिरी जिह्याच्या मंडणगड तालुक्यातील वलवते गावातील युवा चित्रकार प्रणय प्रकाश फराटे याने. कोरोनामुळे सर्वत्र बंद असताना कुंचल्याने जलरंगाचे अप्रतिम फटकारे मारत प्रणयने तब्बल शंभर जलरंगांतील कलाकृती साकार केल्या आहेत याबाबत बोलताना प्रणय फराटे म्हणाला लॉकडाऊनच्या कालावधीत काहीतरी वेगळे करावे या इराद्याने मी दररोज एक जलरंग कलाकृती साकारायचे ठरवले. हा नियम मोडून दिवसभर जलरंग आणि निसर्ग यांच्यासोबत राहून गेल्या २५दिवसांत जवळपास शंभर कलाकृती साकारल्या आहेत. कोकणचा निसर्ग रसिकांनी कलाकाराच्या नजरेतून पहावा आणि निसर्गातील अद्भुत दृश्ये पहायला मिळावीत हा यामागील उद्देश आहे. या सर्व कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन भरविण्याचा माझा मानस आहे.
www.konkantoday.com