
शिरगाव प्रा.आ.उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे.सौ.श्रद्धा मोरे, माजी सरपंच व दीपक मोरे यांची ना.उदयजी सामंत यांना विनंती.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ही मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, आणि या ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 12 ते 14 हजारावर असून या ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक उपआरोग्य केंद्र कार्यरत आहे. याठिकाणी लसीकरणाची सोय नाही, या उपकेंद्रातील कोतवडे प्रा.आ.केंद्रात लसीकरण सुरू आहे,परंतु याठिकाणी व रत्नागिरी शहरात प्रचंड गर्दीमुळे लसीकरणासाठी जाणे शक्य होत नाही, किंवा गेल्यास लस संपली असल्याने बऱ्याच वेळा परत यावे लागत आहे. यातून संसर्ग अधिक वाढण्याचा धोका आहे. तरी मा.ना.उदयजी सामंत साहेबानी यात लक्ष घालून शिरगाव उपकेंद्रात स्वतंत्र लसीकरण सुरू करावे अशी मागणी ,माजी सरपंच सौ. श्रद्धा मोरे व दीपक मोरे यांनी केली आहे. यामुळे रत्नागिरीतील लसीकरणावरील ताण कमी होणेस मदत होईल तसेच वृद्ध ग्रामस्थांना जवळ लस घेणे सोईस्कर होईल.
www.konkantoday.com