
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ झाली
राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीमध्ये लॉकडाऊननंतर कमालीचा फरक पडलेला दिसत आहे. कारण, आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत (डबलिंग रेट) वाढ झाली आहे. या पंधरवड्यात मुंबईचा कोरोना डबलिंग रेट १५ दिवसांनी वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील डबलिंग रेट ५५ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. ही परिस्थिती अशीच सुधारत राहिल्यास आरोग्य यंत्रणांवरील भार कमी होईल.
www.konkantoday.com