
स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद १३ कोटीं १५ लाखांच्या नवीन ठेवी संकलित संस्थेबाबतच्या विश्वासार्हतेची ही पावती – ॲड. दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दि.२० जून पासून प्रारंभ झालेल्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. आज अखेरच्या दिवशी १ कोटीं ६ लाखांच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या. १३ कोटीं १५ लाखांच्या नवीन ठेवी संस्थेकडे गुंतवल्या गेल्या. एकूण १०२३ ठेव खात्यामध्ये १३ कोटीं १५ लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. १६८ नवीन ठेव खाती यात समाविष्ट आहेत.
संस्थेच्या एकूण ठेवी २३८ कोटी झाल्या असून संस्थेची कर्ज १६० कोटी १५ लाख असून स्वनिधी २७ कोटींचा असून संस्थेचा संमिश्र व्यवसाय ३९८ कोटींचा झाला असून संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये ठेवीदारांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला. प्रधान कार्यालयात २ कोटी ८७ लाखांचे ठेव संकलन झाले असून मारुती मंदिर शाखेत २ कोटी २७ लाखांची ठेव संकलन झाले असून कुवारबाव शाखेत १ कोटी २९ लाखांचे ठेव संकलन झाले आहे. उर्वरित शाखांमध्ये प्रत्येकी २५ लाखांचे वर ठेव संकलन झाले असून कोरोना कालखंडातही अभूतपूर्व प्रतिसाद ठेव संकलनाला प्राप्त झाला. हे संस्थेबाबत असलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक आहे. १ हजार पेक्षा जास्त ठेव खात्यात संकलन होत यावरून संस्थेचा विस्तृत झालेला पाया लक्षात येतो. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था नवनवीन आर्थिक उपक्रम घेऊन ग्राहक सभासदांना उत्तमोत्तम आर्थिक सेवा देत मार्गक्रमित राहील. उत्तम ग्राहक सेवा देत, ग्राहकांचा जनाधार वृद्धींगत करत, सहकार तत्व जपत, व्यवसाय वृद्धी करणे हे उद्दिष्ट राहील. सर्व ठेवीदर सभासदांनी संस्थेच्या ठेव वृद्धीमासात प्रचंड प्रतिसाद देऊन रौप्यमहोत्सवी ठेव वृद्धीमास संस्मरणीय केल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांनी धन्यवाद दिले आहेत.
www.konkantoday.com