निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे -मद्रास उच्च न्यायालय
देशातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी केली आहे. देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com