
शासकीय कोविड सेंटर मध्ये रूग्ण लवकर बरा व्हावा म्हणून त्याला पौष्टिक आहार देण्याचा प्रशासनाचा निर्णय
शासकीय कोविड सेंटर मध्ये रूग्ण लवकर बरा व्हावा म्हणून त्याला पौष्टिक आहार दिला जातो. या आहारात उकडलेले अंड, संत्री-मोसंबी, सफरचंद, केळी, डाळींब बरोबर परिपूर्ण शाकाहारी जेवण आणि बुधवारी दुपारी मांसाहरी मंडळींसाठी चिकन करी,चिकन फ्राय चा आहार दिला जातो.
रोज सकाळी सात वाजता गरम पाणी आणि शेंगदाणा चिक्की,तीळ चिक्की,राजगिरा चिक्की,शेंगदाणा लाडू,तीळ लाडू,राजगिरा लाडू एक दिवस आलटून पालटून दिले जातात.साडे आठ वाजता नाष्ट्याला उकडलेले अंड, पोहे, उपमा, चहा दुपारी १ वाजता जेवण. त्यामध्ये तीन चपाती, भात, डाळ, उसळ, चटणी, संध्याकाळी चार वाजता उकडलेले अंड आणि फळे, रात्री ७ वाजता जेवण त्यानंतर ९ वाजता दूध हळद असा आहार दिला जातो अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com